सुक्के चिकन with चिकनचे कालवण By Riddhi Shinde

VOTE & SHARE

Let your favorite Recipe win

सुक्के चिकन with चिकनचे कालवण

ही महाराष्ट्रातील घाटावरची रेसिपी आहे .व यात वापरलेला घाटी मसाला ही घाटावरची स्पेसयलिटी आहे.(सातारा)
Read More

Serves

३ ते ४ व्यक्ती साठी

Cooking Time

४५ मिनिटे

Meal Type

MAIN COURSE

Rate This Recipe8

INGREDIENTS

 • साहित्य:-सुक्के चिकन करण्यासाठी मी पाव किलो बोनलेस चिकन घेतले आहे .कालवण बनवण्यासाठी मी यातलेच ५ ते ६ तुकडे वापरले आहेत.
 • चिकन मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य :- मीठ,लिंबाचा रस, आलं लसणाची पेस्ट प्रत्येकी १टीस्पून,हळद अर्धा टीस्पून ,२टीस्पून दही ,
 • ग्रेव्ही साठी लागणारे साहित्य :-५ कांदे,३ टोमॅटो ६ लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप
 • गरजे नुसार तेल. घाटी मसाला चवीनुसार ,काश्मिरी लाल मिरची पावडर गरजेनुसार.

PREPARATION

 1. 1

  कृती:- सर्वात प्रथम चिकन ला मॅरीनेट करून घ्या. व कालवण बनवण्यासाठी याच चिकन मधले ५तें६ तुकडे बाजूला कडून ठेवा( कालवण बनवण्यासाठी तुम्ही जास्तीचे चिकन घेऊ शकता).
 2. 2

  नंतर कांदा, लसूण,खोबरे, टोमॅटो हे सर्व एका पॅन मध्ये चांगले भाजून घ्या भाजताना थोडे तेल घाला . भाजून घेतल्यावर थंड करा व मग त्याची पेस्ट करून घ्या.
 3. 3

  आता त्याच पॅन मध्ये तेल घाला त्यात आलं ,लसणाची पेस्ट घाला व गॅस मंद करा नंतर त्यात ३ चमचे घाटी मसाला व मिरची पावडर २चमचे घाला व चांगले परतून घ्या व नंतर मॅरीनेट केलेले चिकन घाला व ३मिनिटे चांगले परतून घ्या. नंतर ग्रेव्ही ची पेस्ट ३ टीस्पून घालून परतून घ्या व अर्धा ग्लास गरम पाणी घालून चिकण चांगले शिजवून घ्या सुक्के होई पर्यंत. तयार आहे सुक्के चिकण वरून कोंथिबीर घाला.
 4. 4

  आता चिकनचे कालवण बनवूया गॅस वर एक छोटा टोप ठेवा ३चमचे तेल घाला तेज पत्ता व दालचिनी फोडणीला घाला व आलं ,लसणाची पेस्ट घाला व चिकण चे तुकडे घाला ४चमचे घाटी मसाला व मिरची पावडर घाला व गॅस मंद आचेवर ठेवा व चांगले परतून घ्या आता उरलेली ग्रेव्ही घाला व चांगले परतून घ्या (५ मिनिटे,) व गरम पाणी घालून चांगले १५ मिनिटे शिजूद्या गॅस मिडीयम ठेवा व १५मिनिटे झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेऊन ५मिनिटे आणखी शिजूद्या व नंतर कोथिंबीर घाला .
0 Comments

Share Your Recipe

Upload your recipes and get maximum votes
to reach the leaderboard .

Upload Your Recipe nowView All Entries